*विरह*
दुःख सोसवेना
नको हा विरह
अश्रू धारा वाहे
उठतो कलह
आठवण तुझी
रोज सतावते
हासरा चेहरा
डोळ्यात दाटते
हरवते भान
तुझाच आभास
आठवे मजला
प्रित सहवास
शोधते किनारा
एकटे जीवन
विरहात तुझ्या
दुःख होई मन
हरवला तारा
निस्तेज चांदणी
अंधार दाटतो
मिटता पापणी
तूजविण माझी
अधुरी कहाणी
विरहात झाले
दूर राजा राणी
*हर्षा भुरे, भंडारा*
















Discussion about this post