🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
*भक्तिरंग*
*******************
चला जाऊ सारे/ विठ्ठल दर्शना//चरणी वंदना/घेवू चला//१
सुखावती डोळे/पाहून श्रीहरी//रूप ते गोजीरी/सकलीक//२
मनी दाटे हर्ष//आनंदी आनंद//देखणा मुकुंद/चोहीकडे//३
व्हावे वारकरी/आषाढी कार्तिकी//होऊन जानकी/संता संगे//४
पाहण्यास मिळे/संतांचा सोहळा//भेट घेण्या गळा/येती जन//५
चढे भक्तिरंग/वारकरी संग//विठू नाम दंग/होऊनिया//६
वृंदा डोक्यावर/ गळा तुळसी माळ//हाती घेती ताळ/वारकरी//७
राम कृष्ण हरी/मंत्र सदा मुखी//राहतील सुखी/भक्तजन//८
सुखी ठेव देवा/विठ्ठल केशवा//भक्तिरंग हवा/आम्हां भक्ता//९
हेच दान मिळो/विसर न पडो//संग तुझा घडो/पांडुरंगा//१०
*******************
*हर्षा भुरे, भंडारा*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
Discussion about this post