*महात्मा ज्योतिबा फुले*
स्त्री शिक्षणाचे प्रणेते
थोर समाजसुधारक
महात्मा ज्योतिबा फुले
शिक्षणाचे खरे जनक…1
देवदूत महिलांसाठी
वाट दाखविली नवी
अज्ञान दूर करण्यास
स्त्री शिकायला हवी…2
विचारवंत लेखक
लिहिले अनेक ग्रंथ
शेतकऱ्यांचे आसूड
लिहून बनले ते संत…3
सत्यशोधक समाज
चळवळीची स्थापना
समाज जागृतीसाठी
केली नवी संघटना…4
पहिले शिक्षक तेच
घरच्या लक्ष्मीस मान
सावित्रीस शिकविण्या
सहन केला अपमान…5
काढल्या मुलींच्या शाळा
पुणे शिक्षणाचे माहेर घर
मुलींसाठी लढा देऊन
महात्मा पदवी केली सर…6
महात्मा जोतिबा फुले
कार्य करून झाले महान
अभिवादन क्रांतीसुर्यास
गाऊन त्यांचे गुणगान….7
*हर्षा भुरे, भंडारा*
Discussion about this post