*विषय:-विद्यार्थी जीवन*
सदा पुस्तकांची साथ
छान विद्यार्थी जीवन
शिकण्याच्या आवडीने
करु आयुष्य पावन
जन्म मानव कठीण
देई सतत परिक्षा
राही विद्यार्थी सर्वदा
हीच मानवाची शिक्षा
शिकू हसत खेळत
जगू विद्यार्थी जीवन
प्रगतीची वाट धरु
राहुनिया समाधान
सत्य अहिंसा स्विकार
होऊनिया ज्ञानवंत
आनंदाने राहू सदा
दूर सारू सारी खंत
*हर्षा भुरे, भंडारा*
Discussion about this post