*अण्णाभाऊ साठे*
लोकशाहीर साहित्यसम्राट
तुकाराम भाऊराव साठे
महाराष्ट्राचे समाजसुधारक
लेखणीतून झालेत मोठे
जन्म सांगलीत वाटेगाव
मातंग समाज मागास वर्ग
समाज जागृतीने आपल्या
जीवनाला दिला नवा मार्ग
अक्षर ज्ञानाचे शिक्षण
साहित्य लेखनात हुशार
कथा कादंबऱ्या पोवाडे
साहित्यिकाला दिला आकार
असे आम्हा अभिमान
साहित्यिकाची खरी शान
गोरगरिबांच्या वेदना जाणून
लोकशाहीर झाले महान
साहित्यरत्न महाराष्ट्राचे
थोर पुरुष विचारवंत
हरवला काळातून आता
याची वाटते सर्वांना खंत
*हर्षा भुरे, भंडारा*
Discussion about this post