शिवाजी महाराज
हायकू
जिजाई पुत्र
छत्रपती शिवाजी
मावळे मित्र……१
शिवाई माता
गड तो शिवनेरी
जन्म भूवरी…….२
निर्भीडपणा
कार्यातून दिसले
युद्ध जिंकले……३
गनिमी कावा
घेऊन करे वार
मुख्य हत्यार……४
संस्थापक ते
मराठा साम्राज्याचे
राज्य शिस्तीचे…….५
मनात जिद्द
जिंकणे हर गड
झालेत सिद्ध…….६
शिकवण ती
सदा स्त्रीचा सन्मान
राजा महान…….७
जाणता राजा
रयतेवर प्रेम
आनंदी प्रजा…….८
नव्हता मान्य
जातीभेद कुठेही
झालेत धन्य…….९
गुरु लाभले
समर्थ रामदास
मनाला ध्यास……१०
जय भवानी
जय शिवाजी नारा
जगी या सारा……११
*हर्षा भुरे, भंडारा*
Discussion about this post