*लावणी*
बघतच राहावे वाटते तुला, भासते तू नभाची चांदणी
चंदेरी धुक्यात ,दूरच्या रानात, दिसते उठून तू गं राणी ||धृ||
रूप तुझे खुलले गं, आलीस धुक्यात न्हाऊनी
नजरेत भरलीस माझ्या, सखे माझे साजणी
तुझ्यावर प्रित जडली, गातो तुझ्यासाठी लावणी
चंदेरी धुक्यात ,दूरच्या रानात, दिसते उठून तू गं राणी ||१||
कुरड्या केसाचे लावण्य तुझे, अप्सरा तू गं राणी
काळजाचा ठोका वाढतोय माझ्या, नको करू आणीबाणी
साथ देशील का गं मला, सुरू करू नवी कहानी
चंदेरी धुक्यात, दूरच्या रानात, दिसते उठून तू गं राणी ||२||
तुझ्यात घायाळ झाले माझे मन, भरलीस माझ्या नयनी
रातीला झोप लागत नाही, तूच येतेस माझ्या स्वप्नी
स्वप्न सुंदरा तू गं, नाचतेस ठुमकत लचकत मोरा वानी
चंदेरी धुक्यात, दूरच्या रानात, दिसते उठून तू गं राणी ||३||
*हर्षा भुरे, भंडारा*
Discussion about this post