*आधार*
पाऊल टाकताना पुढे
हवा असतो सदा आधार
पाठीशी हवा असतो हात
तेव्हाच जीवनाला आकार
आत्मविश्वास वाढतो
असेल कुणीतरी पाठीशी
हिंमतीने उभा राहण्यास
बळ येते ,जवळ होते काशी
वेलीला वाढण्यासाठी
हवा असतोच आधार
उंच वाढते भरभर ती
तेव्हाच येतो बहार
काळजी नसते कसलीच
दाखवितो योग्य वाट
आधार असेल चांगला
जीवनाची सुरु होई पहाट
असवा आधार प्रत्येकाला
आई-वडील ,मैत्री , गुरु
आनंदी जीवन जगण्याची
रोजच नवी वाट होते सुरू
*हर्षा भुरे, भंडारा*
Discussion about this post