*चार भिंतीतले जग*
चार भिंतीतले जग
जसा राघू पिंजऱ्यात
पंख सर्व छाटलेले
कोंडमारा हा मनात
मुखवटा लावलेला
चार भिंतीतले जग
नको असले जीवन
विचार भलते मग
नसे कुणाशी संपर्क
आपल्यात शोधे सुख
घुसमट मनातली
लपवून सारे दु:ख
कुणासही न आवडे
चार भिंतीतले जग
मुक्त जीवन जगणे
जरी असे दगदग
हवे स्वातंत्र्य जगणे
नको चार भिंतीतले
खरे आनंद जीवन
जगावे हे मनातले
*हर्षा भुरे, भंडारा*
Discussion about this post