*लेखणीच्या सोबतीने*
मनातील भाव व्यक्त
कोऱ्या कागदी होतात
लेखणीच्या सोबतीने
काव्य रुपात येतात
साहित्यिक घडे नवा
भरपूर शब्द संच
धार येताच लेखणी
मिळे स्वाभिमानी मंच
जग बदलू शकतो
लेखणीच्या सोबतीने
नवे युग बघूयात
विचारांच्या मदतीने
जणू मैत्री जिवलग
साथी सोबती लेखणी
पुस्तकांचा लेखाजोखा
भाव देणारी देखणी
नवी ओळख देणारी
हातातले नवे शस्त्र
सोबतीला ही लेखणी
जग जिंकणारे अस्त्र
*हर्षा भुरे, भंडारा*
Discussion about this post