*युवा तू जागा हो*
भविष्याची सुत्रे
तूच सुत्रधार
युवा तू जागा हो
देऊन आधार…१
वाम मार्ग त्याग
सत्याची घे बाजू
विचार सगळा
नको कधी माजू…२
संस्कारी जीवन
घे व्यसनमुक्ती
संताचे विचार
काढ नवी युक्ती…३
युवा तू जागा हो
तू वारसदार
लढण्या अन्याया
सदैव तयार…४
अवलंब नवा
घडव तू क्रांती
समाज पाठीशी
विनाश अशांती…५
घे उंच भरारी
नभ हे मोकळे
युवा शक्ती नवी
जग ही वेगळे…६
*हर्षा भुरे, भंडारा*
Discussion about this post