क्रिकेटचे जग
वेड लावणारा खेळ
सर्व भारतीय गुंग
नाद क्रिकेटचा असा
झाले बघणारे दंग
दिसे अकरा खेळाडू
क्रिकेटच्या मैदानात
चौके छक्के लागताच
येई प्रेक्षक जोमात
मिळे दाद खेळाडूंना
पारी जिंकणे मनात
लावी बळ खेळायला
जिम्मेदारी प्रत्येकात
खेळ जगातले खरे
खेळाडू महानायक
नावलौकिक जगात
दिसे खेळण्यात लक
मेहनती सारा संघ
विजयी विश्वचषक
देशवासींयाना गर्व
- खेळ हा लाखात एक
हर्षा भुरे, भंडारा
Discussion about this post