साहित्य माझे जीवन समूह आयोजित दि.२८ ऑक्टोबर २०२३ “लख्ख प्रकाश चंद्राचे” या ऑनलाईन काव्यस्पर्धेचा निकाल नुकताच घोषित करण्यात आला.यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून ३६ कवी/कवयित्रींनी सहभाग घेतलेला होता. या काव्य स्पर्धेचे परीक्षण शरयू कुलकर्णी यांनी केले. व त्यांनी स्पर्धा चा निकाल सर्वोत्कृष्ट क्रमांक कवयित्री विद्या प्रधान ठाणे, उत्कृष्ट क्रमांक कवयित्री माधुरी इनामदार, कवयित्री वैशाली बोरसे, प्रथम क्रमांक हर्षा भुरे, द्वितीय क्रमांक कवयित्री डॉ. रेखा पौडवाल, तृतीय क्रमांककवी विनायक पाटील, कवी पद्माकर वाघरूळकर, उत्तेजनार्थ क्रमांक कवी अशोक मोहिते, कवयित्री वंदना चौधरी यांचे साहित्य माझे जीवन समूहाकडून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. समूह संस्थापक अजय राऊत, समूह संस्थापिका हर्षा भुरे, समूह संकलिका कवयित्री शुभांगी डांगरे यांच्या हस्ते या ऑनलाईन काव्यलेखन स्पर्धेचा निकाल उत्साहत घोषित करण्यात आला.
Discussion about this post