महाराष्ट्रवादी आपल्या दारी संपर्क साधा : दिलीप पनकुले
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवीन धोरण राबविण्यासाठी आज दक्षिण पश्चिम विभागीय बैठक प्रदेश सरचिटणीस दिलीप पनकुले ह्यांच्या उपस्थितीत रामकृष्ण नगर बगीचा देव नगर चौक येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीत प्रदेशाध्यक्ष आमदार मा. जयंत पाटील यांनीं दिलेल्या निर्देशानुसार प्रत्येक प्रभागात घरोघरीं जाऊन मी महाराष्ट्रवादी बाबत चर्चा करून केन्द्र सरकार ने व सध्याच्या महाराष्टातील सरकारच्या ध्येय धोरणाबाबत चर्चा करून आपल्या पक्षाची भूमिका मांडावी त्याच प्रमाणे त्यांच्या अनुमतीने त्याच्या दारावर स्टिकर लावावे व त्यांच्या अनुमतीने ऑनलाईन सभासद नोंदणी करावी अशी सूचना दिलीप पनकुले ह्यांनी प्रमूख पदाधिकारी ह्यांना दिली. शहर चिटणीस व दक्षिण पश्चिम महिला कार्याध्यक्ष पिंकी शर्मा ह्यांनी पक्ष संघटनेबाबाबत मनोगत व्यक्त केले. प्रा. विलास पोटफोडे शहर चिटणीस ह्यांनी आपले विचार व्यक्त केले. बैठकीला माचींद्रा आवळे सोपानराव शिरसाट, विजय मसराम चेतन मस्के बबलू चौहान
Discussion about this post