आमदाराच्या दबावात मनपाने केली बेकायदेशीर कारवाई
आम आदमी पक्षाचा महानगरपालिका परिसरात ठिय्या आंदोलन
चंद्रपूर, दि. 1 नोव्हेंबर: चंद्रपूर शहर महानगर पालिकेची रीतसर परवानगी घेऊनही कर्मचाऱ्यांनी बॅनर काढण्याची कारवाई केली. स्थानिक आमदाराच्या दबावात महानगर पालिका कारवाई केल्याचा आरोप आम आदमी पक्षाने केला आहे. या प्रकरणी आम आदमी पक्षाने महानगरपालिके परिसरात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर स्वतःच दिलेली परवानगी रद्द करीत फलक परवानगीसाठी घेतलेली रक्कम परत करण्याची नामुष्की मानपावर ओढवली आहे.
मागील २०१९ मध्ये अपक्ष उमेदवार किशोर जोरगेवार यांनी नागरिकांना २०० युनिट वीज मोफत देण्याची घोषणा केली होती. मतदारांना भूलथापा देऊन विजय मिळविला. मात्र, ४ वर्ष पूर्ण होऊनही ही मागणी पूर्ण झाली नाही. याच घोषणेची आठवण करून देण्यासाठी आम आदमी पक्षाने शहरात २०० बॅनर लावले. त्यासाठी चंद्रपूर शहर महानगर पालिकेची रीतसर परवानगी घेण्यात आली. शुल्कापोटी ८ हजार रुपये भरले. “200 युनिट” हा मुद्दा घेऊन फिल्मी डॉयलॉग बॅनर शहरभर लागले. सोशल मीडिया आणि माध्यमातून ते प्रचंड वायरल झाले. त्यामुळे आमदार किशोर जोरगेवार यांना विजेचा जोरदार झटका बसला. करंट लागल्यागत अवस्था झालेल्या आमदारानी मनपा अधिकाऱ्यांना फोन करून बॅनर काढण्यासाठी दबाव आणला. या बॅनरला महानगरपालिकेने काढून टाकले. या कारवाईवर आम आदमी पक्षाने संताप व्यक्त केला. मनपात जाऊन ठिय्या आंदोलन केले.
आम आदमी पक्षाच्या चंद्रपूर जिल्हाध्यक्ष मयूर राईकवार म्हणाले की, आमदार किशोर जोरगेवार यांनी 200 युनिट मोफत वीज देण्याची घोषणा केली होती, पण ती अजूनही पूर्ण झालेली नाही. आमदारांनी केवळ भूलथापा दिल्या आहेत. नागरिकांमध्ये या घोषणेमुळे मोठी नाराजी पसरली आहे. चंद्रपूर महानगर पालिकेने आमदाराच्या दबावात परवानगी घेतली असतानाही महानगरपालिकेने आमचे बॅनर काढून टाकले. आम आदमी पक्षाच्या आंदोलनामुळे महानगरपालिकेत तणाव निर्माण झाला होता. महानगरपालिकेचे अधिकारी आम आदमी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करत होते. या चर्चेअंती महानगरपालिकेने परवानगी रद्द करून रक्कम परत करण्याचा निर्णय घेतला. स्वतःच दिलेली परवानगी रद्द करून रक्कम परत करण्याची नामुष्की मनपावर आली आहे.
Discussion about this post