झुबकेदार सुंदर
झेंडूची फुले केशरी
सूर्य तेज दिसताच
प्रभात होई हासरी
रंग त्यांचा मनोहर
केशरी लाल पिवळी
गर्द हिरव्या पानांत
उठतात फुले कोवळी
सणासुदीच्या दिवशी
लावता तोरण दारी
घराला आणली शोभा
सजलीत घर सारी
देवाला चढवताच
देव ही होई प्रसन्न
हार चढे प्रतीमेस
असो कोणतेही सण
दारात छान रांगोळी
सजले झेंडूची फुले
गालीचाच जणू ताजा
उल्हासाने मन खुले
प्रत्येक पुजेत मान
फुले सुंदर झेंडूची
लहान मुले खेळती
दूर भासवी चेंडूची
*हर्षा भुरे, भंडारा*
Discussion about this post