Flavored spices in the market with unmatched quality of authentic traditional taste
अस्सल पारंपरिक चवीची अजोड गुणवत्ता असलेले स्वादिती मसाले बाजारात
प्रतिनिधी/नागपूर
स्वादिष्ट, खमंग आणि रूचकर मसाले जेवणाची चव वाढवतात. दर्जा आणि गुणवत्ता हीच ओळख असलेल्या पगारीया ग्रुपने उत्तम खवैय्यासाठी “स्वादिती’ मसाल्यांची ४१ चवींची श्रेणी बाजारात आणली आहे अशी माहिती कंपनीचे संचालक उज्वल पगारीया यांनी पत्रपरिषदेत दिली. मसाला उत्पादन निर्मितीत सुमारे १०० कोटींची गुंतवणूक केली असून अगदी ५ रूपयांच्या पाऊचपासून मसाले विक्रीला आहे. आमच्या प्रत्येक मसाल्याची चव तुमच्या जिभेवर रेंगाळत राहिल. लो टेंपरेचर ग्राईडींग प्रक्रियेमुळे मसाल्याची मूळ चव कायम राहाते. विदर्भ आणि मराठवाड्यात अशी प्रक्रिया करणारा हा एकमेव ब्रॅण्ड असल्याचा दावा पगारीया यांनी केला.
पहिल्या टप्प्यात महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये उत्पादने उपलब्ध राहाणार आहे. पदार्पणाच्या ५ वर्षांच्या आत संपूर्ण भारतातील एक विश्वसनीय ब्रँड बनणे हे कंपनीचे उद्दिष्ट आहे. ४१ नावीन्यपूर्ण उत्पादनांची श्रेणी असून २३ वैविध्यपूर्ण चवी आहे. २८२ वितरकांचे जाळे पसरले आहेे. पराठा मसाला, मखाना व टिक्का मसाला या तीन नवीन चवी आम्ही आणल्या आहे.
ग्राहकांच्या अपेक्षांच्या पूर्तीसाठी आम्ही केवळ पारंपरिक भारतीय मिश्रणेच नव्हे तर नावीन्यपूर्ण मिश्रणांची श्रेणी आणली आहे. ग्राहकांना वाजवी किमतीत स्वादिष्ट व दर्जेदार उत्पादने प्रदान करणे हा आमचा उद्देश आहे असे पगारीया यांनी सांगितले. समूह एफएमसीजी उद्योगात झपाट्याने विकसित होत आहे आणि अनेक राज्यांमध्ये “स्वादिती’ नावाचा फूड ब्रँड स्थापन करीत आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशमध्ये सध्या उपस्थिती आहे. पावडर मसाले, हिंग आणि मीठ, संपूर्ण मसाले तसेच ६ वेगवेगळ्या उत्पादन श्रेणींमध्ये ४१ उत्पादनांचा समावेश असलेली विशाल श्रेणी आम्ही टप्प्याटप्प्याने बाजारात आणणार आहो. यावेळी सिएमओ मनीष जैन व नॅशनल सेल्स हेड संजय अरोरा उपस्थित होते.
Discussion about this post