आई ,तुझा भक्त अजान
जागर घाली रात्रंदिन
श्रद्धा भक्ती तुझ्यासमोर
नाही कोणी धनी न दीन
घालतो लोटांगन दारी
नवसाला पाव गं अंबे
जगतजननी कृपाळू
धाव गं आई जगदंबे
आस तुझ्यावर भक्ताची
तार तया संकटातूनी
कृपादृष्टी ठेव सदैव
घे गं मनातले जानूनी
घेऊ नको अशी परिक्षा
ठेव तुझा गं आशिर्वाद
इच्छा जाण तूच भक्ताची
कृपा ठेव गं निर्विवाद
उदो गं अंबाबाई उदो
नाव तुझेच भक्ता ओठी
नवरात्रीचा सण येता
भरतो श्रद्धेने गं ओटी
Discussion about this post