शिक्षक संघाच्या विमा मागणीला जनता सहकार बँकेची चालना
जुन्नर, 8 ऑक्टोबर 2023- शिक्षक संघाच्या पुणे ग्रामीणचे अध्यक्ष निलेश काशीद यांच्या सातत्याने पाठपुराव्यामुळे जुन्नर तालुक्यातील दोनशे शिक्षकांना जनता सहकार बँकेच्या माध्यमातून विमा कवच प्राप्त झाले आहे. या विमा पॉलिसीद्वारे शिक्षकांना अपघाती मृत्यू, अपंगत्व आणि गंभीर आजारांमध्ये आर्थिक मदत मिळेल.
यापूर्वी शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष भास्कर पानसरे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. त्यावेळी त्यांच्या कुटुंबाला विमा संरक्षणाच्या रकमेपासून वंचित राहावे लागले होते. यामुळे सर्व शिक्षकांमध्ये कमालीची नाराजी पसरली होती.
शिक्षक संघाच्या विद्यमान अध्यक्ष निलेश काशीद यांनी या विमा प्रकरणी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे अखेर जनता सहकार बँकेने शिक्षकांना विमा कवच प्रदान करण्याचा निर्णय घेतला.
नुकतेच जुन्नरच्या शंकरराव बुट्टे पाटील विद्यालयात पार पडलेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात शिक्षकांचे विमा पॉलिसीचे फॉर्म भरून पॉलिसीची प्रत प्रदान करण्यात आली. या प्रसंगी शिक्षक संघाचे अध्यक्ष निलेश काशीद, संजय खराडे, जनता बँकेचे शाखा व्यवस्थापक ओंकार रसाळे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
बँक ऑफ इंडियाची लिंक फेल(Opens in a new browser tab)
Discussion about this post