शोध घेतो नवा
मिळे न नात्याचा
खचलेला देह
हात मदतीचा
व्यवसायासाठी
शहरी वळला
क्षण विसाव्याचे
गावी विसरला
आठवण येई
छेडतो तो गंध
शेवटी आठवे
मातीचा सुगंध
जिथे बालपण
तिथेच मरण
नाळ जुळलेली
मातीचे स्मरण
व्हावे जवळीक
घडावा संस्कार
मातीत शोधला
खरा तो आधार
*हर्षा भुरे, भंडारा*
Discussion about this post