फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सिद्धावार यांनी वेधले लक्ष्य
या ११ पदासाठी भरती; ५ तारखेला मुलाखती
चंद्रपूर, 3 ऑक्टोबर 2023: चंद्रपूर बस स्थानकावर मागील काही दिवसापासून बस गाड्या वेळेत येत नसल्याने आणि अपुऱ्या बसमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. बस केव्हा येईल याबाबत चौकशी कक्षात विचारणा केली असता, “सांगता येत नाही! वाट पहा!!” असे उत्तर देण्यात येत आहेत.
याबाबत वरिष्ठ पत्रकार विजय सिद्धावार यांनी फेसबुकवर एक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, “आज चंद्रपूर बस स्थानकावर सव्वा नऊ ते दहा वाजेपर्यंत नागपूर बस न आल्याने चौकशी कक्षात विचारणा केली. बस केव्हा येईल? सांगता येत नाही! वाट पहा!! असे उत्तर मिळाले. बसचा टाईम टेबल नाही काय? या प्रश्नावर त्यांनी पाच वर्षापासून कर्मचारी भरती बंद आहे. लोक रिटायर होत आहेत, ड्रायव्हरची भरती नाही, कंडक्टरची भरती नाही. नवीन बसेसचा पुरवठा नाही, जुना बसेस खटारा होऊन पडलेले आहेत अशी परिस्थिती असताना कोणती बस वेळेवर येईल हे आम्ही सांगू? आता काय बोलणार?”
खाजगी ट्रॅव्हल्स धारकांची मुजोरी
ही फेसबुक पोस्ट वायरल झाल्यानंतर या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काही लोकांनी यावर टीका केली आहे तर काही लोकांनी बससेवेच्या दुरवस्थेबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
या घटनेमुळे चंद्रपूर बससेवेच्या दुरवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सरकारने याकडे लक्ष देऊन बससेवेचे आधुनिकीकरण करण्यासाठी आणि प्रवाशांचे सोयीसुविधा वाढवण्यासाठी पावले उचलावी अशी मागणी होत आहे.
गजराजाचा मृत्युने वनविभागात खळबळ The death of Gajraja caused excitement in the forest department
Discussion about this post