Khabarbat Gondia Maharashtra India
नवेगावबांध : शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर कुटुंबियांवर आर्थिक संकट, हरीषभाऊ बन्सोड यांनी केली आर्थिक मदत
नवेगावबांध, दि. 1 ऑक्टोबर 2023 : सडक अर्जुनी तालुक्यातील कनेरी येथील शेतकरी रमेश कोल्हे (वय 57) यांनी गाव शिवारात झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे. या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना हरीषभाऊ बन्सोड यांनी आर्थिक मदत करून मानवतेचा संदेश दिला आहे.
यावेळी कनेरी येथील सरपंच ज्योती प्रकाश पाउलझगडे, उपसरपंच विशाल वाघाये, भरत मेंढे, विणू भेंडारकर, दिनेश मोहतुरे, सुधीर शिवणकर आदी गावकरी उपस्थित होते. यावेळी हरीषभाऊ बंसोड यांनी शासनाच्या मदत मिळवून देण्यास मदत करू असे आश्वासन दिले.
रमेश कोल्हे हे शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. मात्र, गेल्या काही वर्षांत शेतीत आलेले नुकसान आणि कर्जाच्या बोजामुळे ते आर्थिक संकटात सापडले होते. यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.
रमेश कोल्हे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असे कुटुंब आहे. या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज आहे. यासाठी हरीषभाऊ बन्सोड यांनी आर्थिक मदत केली आहे. तसेच, शासनाच्या मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले आहे.
या घटनेमुळे कनेरी येथे हळहळ व्यक्त केली जात आहे.
Discussion about this post