khabarbat News | CS2 | Breaking news
उल्हासनगर, 23 सप्टेंबर 2023: उल्हासनगरमधील सेंच्युरी कंपनीच्या CS2 डिपार्टमेंटमध्ये आज दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास मोठा स्फोट झाला. या स्फोटामुळे 5 कामगार ठार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर 8 गंभीर जखमी झाले आहेत. स्फोटाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, कंपनीतील काही कामगारांनी या स्फोटापूर्वी गॅस लीक झाल्याची माहिती दिली आहे. (Ulhasnagar Century)

आज शहाड (उल्हासनगर) येथील सेंचुरी रेयान या कंपनीमध्ये गॅसचा स्फोट होऊन झालेल्या अपघातात काही जण दगावली तर काही जण जखमी झाली असून या अपघातात जखमी झालेल्या कामगारांची आमदार रोहित पवार यांनी रुग्णालयात जाऊन भेट घेतली व तब्येतीची विचारपूस करत घटनेची माहिती घेतली.
स्फोटामुळे कंपनीच्या CS2 डिपार्टमेंटमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनास्थळी पोलीस आणि अग्निशमन दल दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे. मृत कामगारांच्या नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. जखमी कामगारांना सेंच्युरी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. उल्हासनगरला वस्तीच्या बाजूला ही फॅक्ट्री आहे. या फॅक्ट्रीत अचानक स्फोट झाला.
अन् काही क्षणात आग पसरली. काही स्थानिकांनी पाणी ओतून आग विझवण्याचा प्रयत्न केला. तर काही जणांनी अग्निशमन दलाला या घटनेची माहिती दिली. अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले आहेत. या जवानांनी आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच फॅक्ट्रीत अडकलेल्या कामगारांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयत्नही सुरू केले आहेत. फॅक्ट्रीत किती कामगार आहेत याची काहीच कल्पना नाहीये. तसेच मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरातील शहाड आणि उल्हासनगर परिसरात सेंच्युरी रियान ही कंपनी आहे. शनिवारी सकाळी १२ वाजण्या च्या सुमारास या कंपनीच्या सीएस२ विभागात मोठा स्फोट झाला, या स्फोटाची तीव्रता एवढी होती की, तानाजीनगर, शहाड गावठाण, गुलशन नगर, शहाड फाटक, धोबीघाट, शिवनेरी नगर,परिसरातील घरांना हादरे बसले होते.
कंपनी प्रशासनाने याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र जखमींना शेजारच्याच कंपनीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

#bigexplosion in the #CS2department of Century Company in #Ulhasnagararea of #Mumbai and initial information is being received that many employees have been seriously injured in this accident. Four to five people are feared #dead in this explosion
उल्हासनगर ब्रेकिंग न्यूज । सेंच्युरी कंपनीच्या स्फोटात 5 कामगार ठार झाल्याची माहितीhttps://t.co/N9f9NM0fA5
— 𝐃𝐞𝐨𝐧𝐚𝐭𝐡 𝐆𝐚𝐧𝐝𝐚𝐭𝐞 ® (@DevShilpa14) September 23, 2023
Discussion about this post