chandrapur Khabarbat | Rain Alrt | Chandrapur, Maharashtra, India Weather Forecast
चंद्रपूर, 21 जुलै 2023: चंद्रपुरात गुरुवारी सकाळपासून ढगफुटी सदृश पाऊस सुरू झाला आहे. या पावसामुळे शहरातील बहुतांश भाग जलमय झाला आहे. रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत आहेत. रस्त्यांना नदीपात्राचे स्वरूप आले आहे. शेकडो घरात पाणी शिरले आहे.
सकाळी 8 ते 12 या वेळेत शहरात मोठा पाऊस झाला आहे. या पावसामुळे महानगरपालिकेची पोलखोल झाली आहे. सखल भागात वस्ती असलेल्या नागरिकांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. पावसामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. वाहतूक ठप्प झाली आहे. घरात पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. तुकूम परिसरातील माउंट कार्मेल स्कुलच्या परिसरात काही घरात पावसाचे पाणी घुसले आहे.
मुसळधार पावसाने चंद्रपूर शहर झाले जलमय(Opens in a new browser tab)
हवामान विभागाने पुन्हा तीन दिवसांच्या अलर्ट दिला आहे. त्यामुळे चंद्रपूरमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवसांत चंद्रपुरात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. ढगफुटीचा धोका आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. ( Rain Alrt | Chandrapur, Maharashtra, India Weather Forecast)
- पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती
- शहरातील अनेक रस्ते जलमय
- अनेक घरात पाणी शिरले
- महानगरपालिकेची पोलखोल
- वाहतूक ठप्प
- जनजीवन विस्कळीत
- हवामान विभागाचा अलर्ट
Discussion about this post