Khabarbat News local Latest News
भंडारा : बावनथडी पुलावरून तीन फुट पाणी, महाराष्ट्र-मध्यप्रदेश मार्ग बंद
ब्रम्हपुरी तालुक्यातील नदी काठावरील गावांना पुराच्या पाण्याने वेढले
विनोद चौधरी/ब्रम्हपुरी : गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाढ झाल्यामुळे गोसीखुर्द धरणाच्या पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदी पात्रात सोडण्यात आल्याने वैनगंगा नदी काठावरील ब्रह्मपुरी तालुक्यातील गावांमध्ये पूर परिस्थिती उद्भवली असून अनेक गावाचा तालुक्याची संपर्क तुटला असल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
विदर्भातील भंडारा येथील पवनी तालुक्यात असलेल्या गोसेखुर्द धरणामध्ये पाण्याच्या पातळीमध्ये प्रचंड वाढ झाल्याने 15 सप्टेंबरला गोसे खुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग वैनगंगा नदीपात्रात सोडण्यात आला आहे. याबाबतची सूचना गोसे खुर्द प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी सतर्कतेचा इशारा म्हणून वैनगंगा नदी काठावरील गावांतील नागरिकांना दिला आहे. पूर परिस्थितीमध्ये नागरिकांनी नाले, वाही, अथवा नदीनाल्यातून आवागमन करू नये अशा सूचना स्थानिक पातळीवरील प्रशासनाने दिल्या आहेत.
गोसेखुर्द धरणाच्या पाण्याच्या विसर्गामुळे वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणे वाढ झाल्याने ब्रह्मपुरी तालुक्यातील नदी काठावरील गावांमध्ये पूर परिस्थिती उद्भवली आहे. तालुक्यातील रनमोचन, खरकाडा ( पिंपळगाव), जुगनाळा, किन्ही, मांगली, बेटाळा, बोळेगाव, अरेरनवरगाव, कोल्हारी, बेलगाव, लाडज, पिंपळगाव, चिखलगाव भालेश्वर सोंदरी, सावरगाव, सोनेगाव, निलज ,गांगलवाडी, पाचगाव , बरडकिन्ही, चीचगाव , आवळगाव, गावासह अनेक गावात संपर्क तुटून शेतजमिनी पुराच्या पाण्याखाली आल्या असून धानपीक, भाजीपाला पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पूर परिस्थिती कडे महसूल व पोलीस प्रशासन लक्ष ठेवून नागरिकांना सतर्क करण्याचे आवाहन करीत केले आहे.
#गोसेखुर्द_धरणातून पाण्याचा प्रचंड विसर्ग करण्यात येत असल्याने गडचिरोली जिल्ह्यातील नद्या आणि नाल्यांना पूर आला असून, काही प्रमुख मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. दरम्यान प्रशासनाने देसाईगंज आणि गडचिरोली तालुक्यातील १९९ नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार #पाऊस पडल्याने आणि गोसीखुर्द धरणातून मोठा विसर्ग करण्यात येत असल्याने छोट्या नद्या आणि नाल्यांना पूर आला असून, गडचिरोली- आरमोरी व गडचिरोली- चामोर्शी या दोन मार्गांवरील वाहतूक आज सकाळपासून ठप्प झाली आहे. भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे २२ दरवाजे अडीच मीटरने, तर ११ दरवाजे तीन मीटरने उघडण्यात आले आहेत. यातून १७ हजार ३५ क्यूमेक्स पाणी सोडण्यात येत आहे. गडचिरोली नजीकच्या पाल नदीला पूर आला असून,नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी सतर्क राहावे,असे आवाहन प्रशासनाने केले आहे. #गडचिरोली: जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडलयाने आणि गोसीखुर्द धरणातून मोठा विसर्ग करण्यात येत असल्याने छोट्या नद्या आणि नाल्यांना पूर आला असून, गडचिरोली-आरमोरी आणि गडचिरोली- चामोर्शी या दोन मार्गांवरील वाहतूक आज सकाळपासून ठप्प झाली आहे. #गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात आज मध्यरात्रीपासून सकाळपर्यंत जोरदार #पाऊस पडलयाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सकाळी ११ वाजतापर्यंत पाऊस सुरु होता. त्यानंतर दिवसभर ढगाळ हवामान होते. मागील चोवीस तासांत मुलचेरा तालुक्यात सर्वाधिक ५२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.
पुरामुळे ब्रम्हपुरी,सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा
पालकमंत्री श्री. सुधीर मुनगंटीवार यांचे जिल्हाधिकारी यांना निर्देश
चंद्रपूर,दि.१७ – सततच्या पावसामुळे आणि गोसीखुर्द धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे वैनगंगा नदीला पूर आला आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे ब्रम्हपुरी आणि सावली तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतात पुराचे पाणी शिरले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे.या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे, असे आदेश वने व सांस्कृतिक कार्य मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.
वैनगंगा नदीच्या पुरामुळे धान,कापूस व सोयाबीन ही पिके गेल्या तीन दिवसांपासून पाण्याखाली आहे. ब्रह्मपुरी व सावली तालुक्यातील शेतकऱ्यांना याचा फटका मोठ्या प्रमाणात बसला आहे. पुरामुळे ब्रम्हपुरी आणि सावली तालुक्यातील काही गावात पाणी शिरल्याने घरांचेही नुकसान झालेली आहे.
त्यामुळे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. पंचनाम्याच्या आधारे संपूर्ण अहवाल सादर करावा असे निर्देशही ना. श्री. मुनगंटीवार यांनी दिले आहेत.
Discussion about this post