News34
चंद्रपूर : घोडाझरी तलावात बुडून वरोरा तालुक्यातील चार युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हि घटना अतिशय वेदनादायी असून या कुटुंबियांना विशेष बाब तत्वावर मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत करण्याची लोकहितकारी मागणी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देत त्वरित निधी देण्याचे आदेश दिले.
वरोरा तालुक्यातील शेगाव येथील मनीष श्रीरामे, धीरज झाडे, चेतन मांदाडे व गिरोला येथील संकेत मोडक असे मृतक युवकांची नावे आहेत. काही दिवसाआधी आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांना आर्थिक सहकार्यकरीत सांत्वन केले होते. अधिकची मदत त्यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मिळण्याकरीता आमदार प्रतिभाताई धानोरकर ह्या प्रयत्न करीत आहेत. त्वरित हि मदत मिळाल्यास मृतकाच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळेल.
सद्या पावसाळा सुरु असून पावसाळ्यात जिल्ह्यात अनेक ठिकाणी युवक फिरायला जात असतात. परंतु त्यांनी पावसाचा आनंद घेत असतांना अधिक जोखिमेचे पाऊल उचलू नये, असेही आवाहन आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी केले आहे.
Discussion about this post