News34
चंद्रपूर – राज्यात खाजगी संस्थांकडून पदभरती घेण्यात येत आहेत. ह्यात लाखो विद्यार्थी सहभाग घेत असून त्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क मात्र भरमसाठ आहे, त्यात पेपर फुटीची व रद्द ची भीती यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. करीता आमदार किशोर जोरगेवार यांनी विधिमंडळात विद्यार्थ्यांचे हे प्रश्न मांडून मार्गी लावावे व कठोर कायदे करावे यासाठी मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार यांनी शिष्ट मंडळासह भेट घेऊन विनंती केली.
तलाठी परीक्षा २०२३ साठी टीसीएस कंपनीकडून खुल्या प्रवर्गासाठी १००० व राखीव प्रवर्गासाठी ९०० रुपये शुल्क आकारण्यात येत आहे. यात २० जुलै पर्यंत ११,५०,२६५ उमेदवारांनी अर्ज आले असून त्याला मुदतवाढ दिल्याने पुन्हा एक ते दीड लाख अर्ज सादर होण्याची शक्यता आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात अर्ज असताना शुल्क मात्र अवढ्याव्य असल्याने फक्त कंपनी ला आर्थिक लाभ मिळविण्यासाठी इतके शुल्क आहे असा आरोप यावेळी मनसेने केला.
करीता पुढील मुद्दे विधिमंडळात मांडून ते विधीमंडळाच्या लक्षात आणून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आव्हान मनसेने केले.
त्यात यापुढे होणाऱ्या *परीक्षांचे शुल्क कमी करावे.
भरमसाठ शुल्क आकारल्या नंतर परीक्षा रद्द झाल्यास विद्यार्थ्यांना पैसे परत दिले जात नाहीत. त्यात उमेदवारांची चुकी नसून त्यांना अश्या रद्द झालेल्या परीक्षेचे शुल्क परत करण्यात यावे.
घोटाळे, पेपरफुटी, व मास कॉपी चा प्रकार थांबविण्यासाठी TCS च्या अधिकृत केंद्रावर परीक्षा घेण्यात यावी
परीक्षा ०३ शिफ्टमध्ये न घेता ०४ शिफ्ट मध्ये घ्यावी जेणेकरुन कमी कालावधीत पार पडेल
तलाठी भरती २०१९ मध्ये विकलेल्या जागा, फुटलेले पेपर, पकडलेले आरोपी याबाबात खुलासा करण्यात यावा.
घोटाळ्याची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी, व आरोपींना ७ ते १४ वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा मिळावी किंवा जन्मठेपेची शिक्षा मिळावी असा कायदा करावा.तसेच विद्यार्थ्यांना रद्द झालेल्या परीक्षेचे शुल्क परत करण्यात यावे, अश्या मागणीचे पत्र यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांना देण्यात आले, यासाठी पुढाकार घेण्याचे आश्वासन आमदारांनी शिष्टमंडळाला दिले.
यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष राहुल बालमवार, व्यापारी सेनेचे महेश शास्त्रकर, ग्रामपंचायत सदस्य विवेक धोटे, मनसे तालुकाध्यक्ष प्रकाश नागरकर, कामगार सेनेचे शहरअध्यक्ष अक्षय चौधरी, करण नायर, कार्तिक खंगार, मयूर मदणकर, सुयोग धनवलकर उपस्थित होते.
Discussion about this post