News34
चंद्रपूर : मणिपूर येथील अत्याचाराच्या घटनेवरून संपूर्ण देशात जनआक्रोश निर्माण झाला आहे. या घटनेचा देशभरात निषेध होत असून, सोमवारी चंद्रपुरात विविध सामाजिक संघटनांच्या नेतृत्वात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला, या मोर्च्यात असंख्य नागरिकांनी आपला सहभाग नोंदविला.
चंद्रपुर जिल्ह्यात अंधाधुंद गोळीबार, महिलेचा मृत्यू
मणिपूर येथे महिलांची नग्न धिंड काढून अत्याचार केल्याच्या प्रकरणाची चित्रफित समाजमाध्यमावर व्हायरल झाल्याने संपूर्ण देशभरात संतापाची प्रचंड लाट उसळली आहे. विशेष म्हणजे घटनेच्या दोन ते तीन महिन्यांनतर ही घटना उजेडात आली. तोपर्यंत स्थानिक राज्यसरकार, केंद्र सरकारने कोणतीही भूमिका घेतली नाही.
सहायक पोलिस आयुक्ताने पत्नी व पुतण्यावर केला गोळीबार
यावरून मणिपूर आणि केंद्र सरकार महिलांच्या सुरक्षेविषयी किती असंवेदशील आहेत, अशी टीका डॉ. गावतुरे यांनी याप्रसंगी केली. तर चंद्रपुरातील दुर्गापूर पोलीस ठाणे हद्दीतील एका दारूच्या दुकानातील शौचालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेले बॅनर लावून डॉ. बाबासाहेबांची अवमानना केल्याची घटना काही दिवसांपूर्वी उजेडात आली. देशाला संविधान देणाऱ्या महामानवाची अशी अवमानना निंदनीय असून, या घटनेचा निषेधही या जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आला.
महानगरपालिका मैदानातून जटपुरा गेट मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले, चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी या मोर्च्यात आपली उपस्थिती दर्शवित मणिपूर हिंसाचाराच्या विरोधात आपला निषेध नोंदवला.
Discussion about this post