News34 गुरू गुरनुले
मूल – शेतात उगविलेला मशरूम घरी आणुन भाजी बनवुन खाल्याने तिन जणाना विषबांधा झाल्याची घटना मूल तालुक्यातील चिमढा येथे शनिवारी सकाळच्या सुमारास घडली.
2 सख्खे भाऊ निघाले अट्टल गुन्हेगार
वर्षा विशाल मांदाडे वय 28 वर्षे, रुतुजा प्रवेन्द्र मोहुर्ले वय 14 वर्षे आणि विहाण विशाल मांदाडे वय 8 वर्षे असे विषबांधा झालेल्यांची नांवे आहेत.
त्या कुटुंबाची आमदार धानोरकर यांनी घेतली सांत्वनपर भेट
मूल तालुक्यातील मौजा चिमठा येथील विशाल मांदाडे यांच्या कुटुंबियांनी शेतातील उगविलेले मशरूम घरी आणुन त्यांची भाजी बनविली, शनिवारी सकाळी त्यांची पत्नी वर्षा विशाल मांदाडे वय 28 वर्षे, विहान विशाल मांदाडे वय 8 वर्षे आणि घराशेजारी राहणाया रुतुजा प्रवेंद्र मोहुर्ले वय 14 वर्षे यांना भाजी दिल्याने या तिघांनीही जेवन केल्यानंतर काही वेळात उलट्या होत असल्याने त्यांना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.
मूल येथे प्राथमिक उपचार करून त्यांना चंद्रपूर रेफर करण्यात आले आहे.
तुजा मोहुर्ले ही गडचिरोली जिल्हयातील पोटेगांव येथील रहिवासी असुन शिक्षण घेण्यासाठी चिमटा येथील आजोबा बोळण लोनबले यांच्या घरी राहात होती हे विशेष.
Discussion about this post