News34
चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील पोलीस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक यांची नांदेड इतवारा भागात बदली झाली.
नायक यांनी पदभार स्वीकारला असून त्यांचं स्थानिक अधिकाऱ्यांनी पुष्पगुच्छ देत स्वागत करण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यात SDPO नायक यांची प्रतिमा कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून होती, अनेक संवेदनशील प्रकरण त्यांनी चांगले हाताळले, मोठ्या गुन्ह्याचा त्यांनी अनेकदा छडा लावला.
चंद्रपूर पोलीस विभागातील शिस्तबद्ध, धडाकेबाज अधिकारी म्हणून त्यांचा कार्यकाळ गाजला होता, मध्यंतरी वणी जिल्हा यवतमाळ त्यानंतर पुन्हा गडचांदूर क्षेत्रात त्यांनी sdpo म्हणून काम बघितले.
कायद्याविरोधात काम करणाऱ्यांना नायक यांनी चांगलीच अद्दल घडविली होती, त्यांची नुकतीच नांदेड जिल्ह्यातील इतवारा भागात बदली झाली.
नांदेड जिल्ह्यात सुद्धा पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून सुशीलकुमार नायक हे आपल्या कार्यातून जनतेच्या मनात आपली छाप सोडण्यात यशस्वी राहणार यात काही वावगं नाही.
Discussion about this post