News34 Bank of India Link fail
गुरू गुरनुले
मुल – बेंबाळ परिसरातील एकूण २६ गावे समाविष्ट असलेल्या गावात राष्ट्रीय कृत बँक ऑफ इंडिया बँकेची एकमेव शाखा आहे. बँकेत परिसरातील असंख्य खातेदार आहेत. सर्वाधिक शेतकरी व्यापारी,व्यावसायिक यांचे खाते आहेत.
या बँकेत तुम्ही पैसे गुंतविले काय? महत्वाची बातमी
सध्यासथितीत शेतकऱ्यांच्या कामाला प्राधान्य अत्यावश्यक असून देखील बेंकेची लिंक फेल असल्याने आणि कर्मचारीही कमी असल्याने गेल्या सात दिवसापासून परिसरातील शेतकरी पैसे न घेताच परत जात आहेत. तसेच नागरिकांचे RTGS. डी.डी. असे जी अनेक कामे खोळंबली आहेत. यामधे शेतकऱ्याना वैयक्तिक विड्रॉल मिळत नसल्याने शेतीच्या ऐन हंगामात शेतकरी, व्यापारी बेजार झाले आहे. काही खातेदार तर आपले खाते बंद करण्याच्या तयारीत असल्याचे बोलून दाखविले आहेत.
चंद्रपुरात आलेल्या मुसळधार पावसात 804 घरांचे नुकसान
शेतकऱ्यांचे क्रॉप लोन, मुद्रा लोन, शैक्षणिक लोन, खातेदारांना मिळत नसल्याने नागरिक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. नवेगाव(भूजला),बाबराळा,नांदगाव, घोसरी, जुनसुरला, बेंबाळ परिसरातील नागरिक मागील एक महिन्यापासून शैक्षणिक लोन साठी चकरा मारत आहेत परंतु मॅनेजरची भेट झाली नाही. लिपिक कर्मचारीही कमी आहेत. खातेदार. नागरिक व शेतकरी त्रस्त झाले आहेत. गावी राष्ट्रीय कृत बँक असून बँकेचा उपयोग काय? असा प्रश्न नागरिकांनी केला जात आहे.
सध्या स्थितीत बँकेचा कारभार कासव गतीने चालू आहे. मुल तालुक्यातील सर्वात मोठे गाव असलेल्या बेंबाळ परिसरातील २६ गावाचा समावेश असून २६ गावातील नागरिकांना बँकेची सेवा पुरविणारे बेंबाळ हीच एकमेव बँक असल्याने या राष्ट्रीय कृत बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष घालून लिंक नियमित कशी सुरु राहील यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.
कर्मचारी पाठवून नागरिकांचे कामे त्वरित करून त्यांची आर्थिक सोय करावी अशी मागणी बेंबाळ येथील ग्राम पंचायत सरपंच चांगदेव केमेकर, व्यापारी दीपक पाटील वाढई, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सुमित पाटील आरेकर, युवक कांग्रेस अध्यक्ष पवन नीलमवार उपसरपंच देवाजी ध्यांबॉइंवार व अनेक शेतकरी आणि नागरिकांनी केली आहे.
ऑनलाईन केबल कापण्याचा प्रकार, पोलिसांनी लक्ष द्यावे
बेंबाळ येथे मुख्य रस्त्यावर सुरु असलेल्या बँक आफ इंडियाच्या शाखेत आणलाईन कामे करुन घेण्यासाठी कंपनीचा केबल लावण्यात आला असून तो केबलच कोणी तरी अज्ञात माथेफिरूने नियमित कापण्याचा प्रकार करीत आहे. त्यामुळे बँकेची लिंक नियमित फेल होत असल्याने खातेदारांचे काम अडले आहेत. याबाबत बेंकेच्या अधिकाऱ्यांनी तक्रारही केल्याचे समजले परंतु अजूनही केबल कपणाऱ्यांचा शोध घेण्यात आलेला नाही. करीता पोलिस प्रशासनाने याचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
बँकेची लिंक फेल होण्याला बी.एस.एन.एल. जबाबदार
बेंबाळ बँकेत बी.एस.एन.एल.नेटवर्किंग सेवा घेण्यात आली असून ही सेवा नेहमीच खंडित होत असते.याबाबत अनेकदा BSNL कार्यालयाला तक्रार देण्यात आली आहे परंतु अजूनही दखल घेऊन दुरस्त करण्यात आली नाही. त्यामुळे बँकेच्या खातेदारांना परत जावे लागत आहे. बँकेची यात काही चूक नाही. तरी बी.एस.एन.एल.च्या अधिकाऱ्यांनी त्वरित लक्ष देऊन बँकेची लिंक दुरस्त करुन द्यावी अशी विनंती बँकेचे व्यवस्थापक श्री लांजेवार यांनी केली आहे*
Discussion about this post