News34
चंद्रपूर: इतर पक्षातील लोकांची सतत चौकशी करा अशी मागणी करणारे?? सतत इतरांच्यावर आरोप करणाऱ्या भाजप नेते किरीट सोमय्या यांची अश्लील चित्रफीत एका खाजगी वाहिनीवर प्रसारित झाली आहे. त्याची चौकशी आता भाजप सरकार करणार का?? आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या बाबतीत काही विधान करणार?? किरीट सोमय्या सारख्या अश्लील नेत्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी, तसेच सोमय्या यांचा निषेध करण्यासाठी चंद्रपुर जिल्हा महिला काँग्रेस (ग्रामीण) च्या वतीने मुसळधार पावसात येथील जिल्हाधिकारी कार्यालया जवळ सोमय्या यांच्या फोटोला जुते मारो आंदोलन करण्यात आले. Kirit somaiya bjp
चंद्रपुरात पावसाचा हाहाकार महिला काँग्रेस च्या जिल्हाध्यक्ष नम्रता आचार्य ठेमस्कर यांच्या नेतृवात हे आंदोलन करण्यात आले. नैतिकतेचा मक्ता मिरवणाऱ्या भाजप च्या या सोमय्या बद्दल राज्याचे भाजप चे नेते काही बोलणार आहे की नाही?? भाजप च्या विद्वान नेत्या चित्रा वाघ याबद्दल काही बोलणार आहे की नाही?? सतत महिला अत्याचारावर बोलणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची याबाबत काय प्रतिक्रिया आहे?? असे प्रश्न जिल्हाध्यक्ष नम्रता आचार्य ठेमस्कर यांनी उपस्थित केले.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची तत्काळ चौकशी करावी अशी मागणी जिल्हाध्यक्ष नम्रता आचार्य- ठेमस्कर यांनी यावेळी केली. चंद्रपूर शहरात आज मुसळधार पाऊस असल्याने महिला काँग्रेस च्या पदाधिकारी रस्त्यात अडकल्या त्यांनी आहे तिथूनच या आंदोलनाला प्रतिसाद दिला.
या आंदोलनाला महिला काँग्रेस च्या तालुका अध्यक्ष शितल कातकर, उपाध्यक्ष लता बारापात्रे, उपाध्यक्ष मुन्नी मुमताज शेख, महासचिव मीनाक्षी गुजरकर, अनुसूचित जाती विभागाच्या महिला शहर अध्यक्ष दीप्ती सोनटक्के, जिल्हा सचिव दुर्गा पाटील,जिल्हा सचिव माला माणिकपुरी, उषा कामतवार दीप्ती सोनटक्के, जिल्हा सोशल मीडियाचे अध्यक्ष मुन्ना तावाडे, बिराज नारायणे, कैलाश दुर्योधन, चेतन बोनगीरवार,नरेंद्र डोंगरे, हाजी अली यांची उपस्थिती होती.
Discussion about this post