News34
चंद्रपूर : जगभरात राजे अनेक होऊन गेलेत. मात्र, ज्यांनी आपल्या प्रजेवर, समाजावर वेगळी छाप सोडली ज्यांनी प्रजेसाठी काही योगदान दिले अशाच राजांचे नाव आज अजरामर आहेत. यातील बहुतेक राजांचे साम्राज्य हे अफाट होते. त्यामानाने राजश्री शाहू महाराज यांचा प्रांत छोटा होता. मात्र शाहू महाराज यांचे योगदान अनन्यसाधारण होते. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच शाहू महाराज हे महान राजांच्या पंक्तीत बसतात, असे प्रतिपादन जागतिक ख्यातीचे आंबेडकरी संशोधक डॉ. सुरज एंगडे यांनी केले.
राजश्री शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त भूमीपुत्र ब्रिगेड द्वारा कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन केले होते, याप्रसंगी ते बोलत होते.
शाहू महाराज यांचे बहुजन आणि वंचित समाजासाठीचे बहुमूल्य योगदान आहे. त्यांच्यातला संवेदनशीलपणा, सक्षमता, दूरदृष्टी यामुळे देशातील बहुजन चळवळीला एक वेगळी दिशा मिळाली आहे.
शाहू महाराज हे हिंदू धर्मावर आस्था ठेवणारे व्यक्ती होते, मात्र 1902 मध्ये ते युरोप यात्रेवर गेले असता त्यांनी तिथल्या सामाजिक स्थिती जाणून घेतली. त्यामानाने आपल्या बहुजन आणि वंचित समाज कसा आहे याची कल्पना त्यांना आली आणि म्हणूनच त्यांनी याच वर्षी आपल्या राज्यात 50% आरक्षण हे बहुजन आणि वंचित समाजासाठी जाहीर केले. त्यांच्या या प्रयत्नांमुळे मराठा समाजाचा विद्यार्थी पहिला आला तेव्हा शाहू महाराजांनी हत्तीवर दवंडी फिरवून साखर वाटली. गुन्हेगारी जाती समजल्या जाणाऱ्या वर्गाला मानवतेची वागणून दिली, त्यांच्या साठी राज्यात तरतूद केली. असेही डॉ. एंगडे यांनी नमूद केले.
कार्यक्रमाचे दुसरे वक्ते अहमदनगरचे बाळासाहेब मिसाळ पाटील यांनी भारतीय लोकशाहीला ईव्हीएम द्वारे निवडणुका घेणे हे किती घातक आहे हे विस्तृतपणे समजावून सांगितले.
या कार्यक्रमाचे उदघाटन शहरांतील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ विनोद नगराळे यांनी केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चंद्रपूरातील प्रसिद्ध बालरोगतज्ञ् आणि समाजसेविका डॉ अभिलाषा गावतुरे होत्या.
शाहू महाराज्यांच्या शिक्षणाविषयक धोरण आणि तालागाळातल्या बहुजन वर्गाला शिक्षित करण्यासाठी शाहू महाराज्यांचं आग्रही भूमिका जी आजच्या लोकशाही राज्यातही हे होताना दिसत नाही ही खंत त्यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून ऍड पी एम सातपुते, सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष हिराचंद बुरकुटे, सेल्फ रिस्पेक्ट मूव्हमेंट बळीराज धोटे, ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत खुशाल तेलंग,9 सोशल एज्युकेशन मूव्हमेंट चे नारे गेडाम सर, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष नेताजी भरणे, इन सब बहुउद्देशीय संस्थाच्या नाहीदा काझी मॅडम, एडवोकेट वैशाली टोंगे, प्रसिद्ध उद्योजक दिलीप वावरे, प्रसिद्ध साहित्यिक प्रब्राह्मणनद मडावी, गुरुद्वारा प्रबंधन समितीचे अध्यक्ष चमकोर सिंग बसरा, बाबासाहेब आंबेडकर लॉयर्स असोसिएशनचे ऍड. पूनमचंद वाकडे, बाणाईचे अध्यक्ष इंजिनियर किशोर सवाने आणि भीम आर्मीचे अध्यक्ष सुरेंद्र रायपुरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन भूमिपुत्र ब्रिगेडचे एडवोकेट प्रशांत सोनुले यांनी केले परिचय वाचन डॉक्टर अंकिता चांदेकर यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉक्टर विद्या राणे यांनी केले कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
Discussion about this post