News34 tech
चंद्रपूर/मुंबई – I PHONE व samsung मोबाईल च्या साम्राज्यात Oppo कंपनी दोघांनाही चांगली टक्कर देत आहे, मागील अनेक वर्षांपासून oppo मोबाईल ने विविध प्रकारचे मोबाईल लाँच केले आहे, आता या मोबाईल च्या दुनियेत Oppo Reno 10 series आज कंपनीतर्फे लाँच करण्यात आला आहे.
Oppo कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईटवर या धमाकेदार मोबाईलचे स्पेसिफिकेशन आपण बघू शकता, हा मोबाईल आधी चायना मध्ये विक्रीला उपलब्ध झाला असून आज भारतात अधिकृतपणे कंपनीने हा मोबाईल विक्रीला उपलब्ध केला आहे.
काय आहे खास?
Oppo 10 Reno opposeries मध्ये कर्व्हड डिस्प्ले, रिफ्रेश रेट 120Hz, रेनो 10 च्या बेस मॉडेल मध्ये snapdragon 778G chipset, रेनो 10 प्रो मॉडेल मध्ये mediatek dimensity 8200 प्रोसेसर भेटणार आहे.
फोटो च्या बाबतीत हा स्मार्टफोन Apple Iphone ला टक्कर देणारा आहे, रेनो 10 मध्ये OIS ला सपोर्ट करणारा 50 MP कॅमेरा, प्रो मॉडेल मध्ये 32MP तर प्रो प्लस मध्ये 64MP चा कॅमेरा देण्यात आला आहे.
Oppo Reno 10 ला 8GB + 256GB स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध आहे, तर प्रो मॉडेल 12GB + 256GB स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध असल्याची पुष्टी करण्यात आली आहे.
किंमत काय?
नियमित Oppo Reno 10 ची किंमत जवळपास भारतात 30,000. Oppo Reno 10 Pro आणि Oppo Reno 10 Pro+ ची किंमत रु. ४५,००० आणि रु. 60,000 विकले जाऊ शकतात.
Oppo Reno 10 ला 67W चार्जिंग सपोर्टसह 5,000mAh बॅटरी पॅक आहे. Oppo Reno 10 Pro आणि Oppo Reno 10 Pro+ मध्ये अनुक्रमे 80W चार्जिंग सपोर्टसह 4,600mAh बॅटरी आणि 100W चार्जिंग सपोर्टसह 4,700mAh बॅटरी असल्याचे सांगितले जाते.
Discussion about this post